Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या : विदर्भातील ७ आणि देशातील ८४ मतदारसंघांत आज मतदान

Spread the love

1. लोकसभा निवडणूक : आज होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, विदर्भातील ७ आणि देशातील ८४ मतदारसंघांत आज  मतदान

2. सातारा – निवडणूक न लढवता शरद पवारांना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडतात- मुख्यमंत्री

3. अहमदनगर: शहरात लाल टाकी परिसरात दोन गटात झालेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, बेबीताई अर्जुन शिरसाठ (वय ६०) असे मयत महिलेचे नाव आहे. रात्री आठ वाजतेची घटना. दोन्ही गटातील पंधरा जण जखमी

4. पुणेः बी. जे. मेडीकल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आरक्षणविरोधी कँडल मार्च काढून सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली

5. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याकडून खेद व्यक्त

6. ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन आणि नमो टीव्हीचे प्रक्षेपणही निवडणूक आयोगाने रोखले

7. पुणे: सराफाकडून खरे सोन्याचे दागिने घेऊन खोटे सोन्याचे दागिने देत फसवणूक करणारी टोळी अटकेत २८ लाखाचे सोने जप्त

8. पुणे : वंचित आघाडी नाही, तर ही किंचित आघाडी; वंचित आघाडीचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही, दोन-अडीच लाखांचे मताधिक्य कमी होऊ शकेल, पण भाजपला २८२ आणि एनडीएला ३६० जागा मिळतील : रामदास आठवले

9. पुणे : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य आणि विधी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद सारडा यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन

10. नागपुरात तलवारींचा मोठा साठा जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

11. नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला, लालूंची प्रकृती गंभीर नसल्याच्या सीबीआयच्या दाव्यानंतर कोर्टाचा निर्णय

आपलं सरकार

Click to listen highlighted text!