Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर लेझर गनचा लाईट आल्याची काँग्रेसजनांना शंका , चौकशीची मागणी

Spread the love

अमेठी येथे प्रचारात व्यस्त असलेले राहुल गांधी लेझर गनच्या निशाण्यावर असल्याची शंका काँग्रेसने व्यक्त केली असून या संदर्भात  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे  लेखी तक्रार अरण्यात आली  आहे. राहुल गांधींना एसपीजीचं संरक्षण आहे. नामांकन अर्ज भरल्यानंतर मीडियाशी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर लाल-हिरव्या रंगाची लेझर लाइट दिसली. राहुल यांच्या चेहऱ्यावर सातवेळा ही लाइट दिसली.

स्नायपरने राहुल यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असावा अशी शंका काँग्रेसने व्यक्त केली असून राहुल यांच्या सुरक्षेत चूक झाली कि काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते. हा प्रकार लक्षात आल्यावर काँग्रेसने तात्काळ राजनाथ सिंह यांना चिठ्ठी लिहून झाल्या प्रकाराची माहिती दिली आहे. या चिठ्ठीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेखही करण्यात आला आहे.

दरम्यान, गृहमंत्रालयाने याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र याप्रकरणी एसपीजीच्या संचालकांना चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. ‘आम्ही व्हिडिओ क्लिप पाहिली. त्यात राहुल यांच्या चेहऱ्यावर हिरवा लाइट दिसतोय. काँग्रेसच्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची ती लाइट आहे. याबाबतची माहिती राहुल यांच्या स्टाफला दिली आहे,’ असे   एसपीजीने  म्हटले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!