Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या …

Spread the love

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या …

1. लोकसभा निवडणूक: सिक्कीममध्ये दुपारी 3 पर्यंत 55 टक्के मतदान

2. लोकसभा निवडणूक: अरुणाचल प्रदेशात दुपारी 3 पर्यंत 50.87 टक्के मतदान

3. लोकसभा निवडणूक: आंध्र प्रदेशात दुपारी 3 पर्यंत 55 टक्के मतदान

4. वर्धा: दुपारी 3 वाजेपर्यंत लोकसभा मतदारसंघात 44.67 टक्के मतदान झाले

5. वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील कारंजा-मानोरा व वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३६ .०३ टक्के मतदान झाले.

6. यवतमाळ : दुपारी 3 वाजेपर्यंत 45.75 % मतदान.

7. भंडारा: भंडारा – गोंदिया मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३८.१९ टक्के मतदान

8. वणी (यवतमाळ) : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी वणी विधानसभा मतदारसंघात गुरूवारी दुपारी १ वाजेपर्यंत ३८.६८ टक्के मतदान झाले.

9. गडचिरोलीत मतदानावरुन परतताना ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात, 3 ठार 9 जखमी

10. विकिलिक्सचे संस्ठापक ज्युलियन असांजे यांना ब्रिटन पोलिसांनी केली अटक

11. नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले मतदान

12. नागपूर : नेर तालुक्यातील आजंती येथे एक आतापर्यंत फक्त ३७ जणांनी केले मतदान; बहिष्कार आंदोलनचा मतदानावर परिणाम

13. अकोला : मुख्यमंत्र्यांची सभा सुरू होण्यापूर्वीच मंडप कोसळला, वाऱ्यामुळे पडलेला मंडप पुन्हा उभारण्याचं काम सुरू.

14. आसाम : काँग्रेसने मतांसाठी घुसखोरीला पाठिंबा दिला सोबतच आसामच्या जनतेला मूलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

15. उत्तरप्रदेश : रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांच्या रोड शो दरम्यान लोकांची गर्दी

16. भाजपने ५ वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत राहुल गांधी यांनी असं केलं मतदारांना आवाहन

17. नाशिक : शेतीबद्दल अस्था नसणारे सरकार सतेत; शरद पवार यांची भाजपवर टीका

18. नाशिक : काँग्रेस विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील काँग्रेस सोडणार नाही, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा व्यक्त केला विश्वास. भाजपच्या बैठकित ते पक्षाचेच काम करत असल्याचे केले

वक्तव्य

19. नागपूर : सर्वाधिक कमी उंचीची महिला ज्योती आमगे हिनेही केले मतदान

20. नागपूर : समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्यासह डॉ पोळ,सुधाकर कडू,माधव कविश्वर यांनीही केले मतदान

21. नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाऊजी दफ्तरी शाळेत बजावला मतदानाचा हक्क

22. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे ट्विट करत केले आव्हान; तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचा पंतप्रधानांनी केला आग्रह

आपलं सरकार

Click to listen highlighted text!