Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या … लंडन विद्यापीठाकडून शाहरुख खान यांना डॉक्टरेट

Advertisements
Advertisements
Spread the love

1. लंडन विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खान याचा डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरव

Advertisements

2. हैद्राबादच्या बंजारा हिल्स भागात मोटारसायकलवरून ३.३ कोटी रुपये  जाणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेतले.

Advertisements
Advertisements

3. औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १६ उमेदवारांचे २६ अर्ज दाखल

4. मुंबईः २० आठवड्यांपेक्षा अधिकची गर्भधारणा असताना महिलेच्या जीवाला धोका असल्यास नोंदणीकृत डॉक्टर हायकोर्टाच्या परवानगीविना गर्भपात करू शकतात, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

5. नागपूरः गरीबीवर काँग्रेसची सर्जिकल स्ट्राइक, गरीबांच्या खात्यात दर महिन्याला १२ हजार जमा होणार , अर्थतज्ज्ञांशी विचारविनिमय करूनच ७२ हजारांचं आश्वासन- राहुल गांधी

6. मुंबईः विमानतळावर पकडले ११ लाख रुपयांचे ३८१ ग्रॅम सोने, बहारीनहून आलेल्या संबंधित प्रवाशाने स्लीपरच्या सोलमध्ये लपवली होती सोन्याची बिस्किटे. राहत अली या प्रवाशाला अटक

7. पुणेः चाकण पोलीस ठाण्यात कारकुन पदावर कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस फौजदाराने ६२ लाख २६ हजार ५२३ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघड

8. मुंबईः शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आरोपी पीटर मुखर्जीचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष कोर्टाने फेटाळला

9. कोल्हापूरः गगनबावडा इथे नीता ट्रॅव्हल्समधून १९ लाख ५० हजार इतकी रक्कम जप्त, मध्य प्रदेशच्या संतोषकुमार पटेल याच्याकडे ही रोकड सापडली. पोलिसांनी संतोषकुमारला ताब्यात घेतले

10. कोल्हापूर: मडके घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेले आनंद सरनाईक यांना पोलिसांनी अडवले

11. नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटेंचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजप सोबतच अपक्ष असे दोन अर्ज; महायुतीतून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात

12. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.२५ टक्के कपात; गृहकर्ज होणार स्वस्त

13. अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज पडून दोघे ठार,  केज तालुक्यातील तांबवा येथेही  अंगावर वीज पडून तारामती बाळासाहेब चाटे यांचा मृत्यू

14. देशात 5 वर्षांत शेतकरी, व्यापारी संकटात. बेरोजगारी वाढली. भाजपाला सत्तेची धुंदी चढली आहे.: अशोक चव्हाण

15. राहुल गांधी हे देशाचे खरे शिपाई. मोदींच्या काळात सर्व काळा पैसा गुजरातमध्ये गेला. राफेलची फाईल दाबून ठेवली : छगन भुजबळ

16. परभणी : गुजरी भागात सखाराम लक्ष्मण आळणे या व्यापाऱ्याची हत्या.

17. नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिककडून गुजरातकडे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पीकअपने जबर धडक दिल्याने अपघातात जखमी झालेल्या नंदू जाधव या म्हसरूळ पोलीस ठाण्यातील बीट मार्शल कर्मचाऱ्याचा मृत्यू.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!