Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ह्रदयद्रावक : विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू , बैलजोडीचा ही करुण अंत

Advertisements
Advertisements
Spread the love

विजेच्या तारांचा अचानक स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांना प्राण गमवावे लागले. बेळगावातील रामदुर्ग तालुक्यातील के. तिम्मापूरमध्ये ही घटना घडली. चौघांसोबतच बैलजोडीचा मृत्यू झाला.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार 35 वर्षीय रेवप्पा कल्लोळी, त्यांची 30 वर्षीय पत्नी रत्नम्मा, आठ वर्षांचा मुलगा सचिन आणि भावाचा मुलगा कृष्णा यांना या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

Advertisements
Advertisements

काल संध्याकाळी पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. विद्युत खात्याच्या कार्यालयाला कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा केला जात आहे.

कल्लोळी कुटुंबीय सकाळी शेतावर निघाले होते. त्यावेळी तुटून पडलेल्या विद्युतभारित तारांचा स्पर्श या चौघा जणांना झाला. विद्युत विभागाची हलगर्जी चार जणांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!