रद्दीच्या बदल्यात को-या वह्या घ्या : लातुरातील स्वामींचा अभिनव उपक्रम

तुम्हाला माहित आहे काय?
100 किलो कागद तयार करण्यासाठी 3 मोठी झाडे तोडावी लागतात ते. हे आपल्याला नको आहे. म्हणुन आपली रद्दी विकु नका. ती आम्हाला द्या व बदल्यात नव्या कोरया वह्या घ्या. आम्ही आपल्या रद्दीचाच कागद बनवू आणि त्याच्याच वह्या तयार करून पुन्हा आपणास देऊ. त्याने झाडे तोडावी लागणार नाहित आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. आहे की नाही घरी बसल्या बसल्या समाज सेवा. तर सांगा कोण कोण तयार आहे, मानवतेच्या तसेच आपल्या पुढील पीढिच्या रक्षणा करिता?
6 एप्रिल 2019 पासुन आपल्या सेवेत सादर राहणार आहोत. आपली रद्दी खालील पत्त्यावर जमा करून त्याची पोच पावती घ्या.
वह्या आल्यास आम्ही तुम्हाला संपर्क करु, मग आपल्या वह्या घेऊन जा. अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.