Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडी : मुंबईतून लोकसभा लढविण्यास एमआयएमचे वारिस पठाण यांनी कळवला नकार

Spread the love

आधी नाही नाही म्हणत नंतर वंचित बहुजन आघाडीकडे एमआयएमसाठी  महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी औजारंगाबादसह किमान दोन जागा मागितल्यानंतर औरंगाबाद आणि मुंबई या दोन ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागा सोडल्या होत्या त्या यापैकी एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मात्र उत्तर मध्य मुंबईतून न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे .

दरम्यान औरंगाबादमधून मात्र आमदार इम्तियाझ जलील हे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एमआयएमच्या आग्रही मागणीला प्रतिसाद देत वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या दोन जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी एमआयएमला परवानगी दिली होती. त्यानुसार वारीस पठाण यांनी हैद्राबाद येथे जाऊन आपली भूमिका पक्ष प्रमुख खा. असदुद्दिन ओवैसी यांच्याकडे मांडली होती.त्यानुसार त्यांनी या दोन जागा लढविण्यासाठी परवानगीही दिली होती.

उत्तर मध्य मुंबईतून भाजप खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून पठाण यांना निवडणूक लढविण्याबाबत एमआयएमने विचारणा केली होती. मात्र आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नसून विधानसभेसाठी भायखळा येथून लढण्याची तयारी करीत असल्याचे पक्षाला कळविले आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पठाण यांनी सांगितले.  औरंगाबादमध्ये शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात जलील हे निवडणूक लढविणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!