Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Lok Sabha Election 2019 : प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यातूनही उमेदवारी , आंबेडकरांसह ९ उमेदवारांचे १५ अर्ज दाखल !

Spread the love

सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात परवा प्रचंड मिरवणुकीने जाऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला अर्ज दाखल केला होता . काल  त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला  अर्ज दाखल केला . त्यांच्या बरोबरच  काँग्रेसचेहिदायत पटेल यांच्यासह ९ उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १९ मार्चपासून सुरु झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार, २६ मार्च रोजी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचीत बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश  आंबेडकर, अपक्ष देवानंद इंगळे , रिपाइं (सेक्युलर)चे भाऊराव वानखडे, बहुजन समाज पार्टीचे भानुदास कांबळे , अपक्ष गजानन हरणे,भाजपाचे संदिप हिवराळे , महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे गजानन कांबळे व क्रांतीकारी जयहिंद सेनेचे अरुण ठाकरे इत्यादी ९ उमेदवारांकडून १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. संबंधित उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!