लोकसभा २०१९ : भाजपच्या ४१ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या ४१ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. २४ मार्चला रविवारी कोल्हापुरात युतीच्या सभेचा शुभारंभ झाल्यानंतर राज्यभरात प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. भाजप पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रातील फौज राज्यात प्रचारासाठी उतरवणार आहे.
स्टार प्रचारकांमध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एकनाथ खडसेंसारख्या नाराज नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. तर उत्तर भारतीय मतांसाठी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार आहेत. ४१ जणांच्या या यादीत नरेंद्र मोदी, अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, योगी आदित्यनाथ, शहानवाज हुसेन, पियुष गोयल, शिवराज सिंग चौहान, मुक्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी या केंद्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश असणार आहे. तसेच राज्यातील नेत्यांचाही या यादीत समावेश असणार आहे.