वसंतदादा घराणे हे काँग्रेसमध्येच रहाणार आहे, त्यांचे सदस्य भाजपात कधीच जाणार नाही : प्रतीक पाटील

वसंतदादा घराणे हे काँग्रेसमध्येच रहाणार आहे, त्यांचे सदस्य भाजपात कधीच जाणार नाही असं प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे. वसंदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षातून सुरुवात केली आणि काँग्रेस पक्षाला सांगली जिल्ह्यात बळ दिलं. त्यांचाच वारसा पुढे आम्ही चालवत आहोत. काँग्रेस पक्षात आम्ही आहोत, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आमची जवळीक आहे. पण त्यांच्याशी झालेली चर्चा ही व्यक्तीगत स्वरूपाची होती त्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये असं आवाहन प्रतीक पाटील यांनी केलं आहे. प्रतीक पाटील यांनी नुकतीच महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रतीक पाटील हेदेखील भाजपाची वाट धरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र काहीही झाले तरीही भाजपात जाणार नाही असे प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे.