Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“पब्जी” च्या नादात “ते दोघे ” इतके बेभान झाले आणि रेल्वेखाली आले …

Advertisements
Advertisements
Spread the love

ऐन रेल्वे पटरीवर  बेभान होऊन पब्जी गेम खेळात बसलेल्या दोन मित्रांचा रेल्वेखाली येऊन जागीच मृत्यू झाला . हिंगोली येथील खटकाळी बाय पास भागात शनिवार संध्याकाळी रेल्वे पटरीवर बसून हे दोन मित्र पब्जी गेम खेळत होते. गेम खेळताना हे दोघे इतके गेम मग्न झाले होते की त्यांना ट्रेन आलेली देखील समजली  नाही.  नागेश गोरे आणि स्वप्निल अन्नपूर्वे अशी या दोन मित्रांची नावे आहेत .

Advertisements

संध्याकाळच्या सुमारास हे दोघे रेल्वेच्या पटरीवर पब्जी गेम खेळत होते. गेममध्ये हे दोघेही इतके बेभान झाले कि , त्यांना ट्रेन आल्याचेही भान राहिले नाही. आणि त्यातच  ते रेल्वेखाली आले.  रेल्वेचा वेग जास्त असल्यामुळे दोघांचे देह रेल्वेखाली छिन्नविच्छिन्न झाले . या दोन्ही मित्रांनी गेम खेळत असताना आपला जिव गमावला लागला आहे. या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.  हे दोघे हनुमान नगर येथील  रहिवाशी होते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!