लोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकर कुठून लढणार हे अद्याप निश्चित नाही

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मी सोलापुरातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांची आहे, बहुजन वंचित आघाडीच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी ही माहिती दिली आहे. परंतु निवडणूक कुठून लढवणार यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. भाजपाचे शरद बनसोडे हे सोलापुरातून विद्यमान खासदार आहेत. बनसोडे यांनी मोदी लाटेत 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अर्थात भारिपचे प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची बातमी मिळताच सोलापूर शहरातीळ वंचित बहुजन आघाडीच्या आणि भारिप -बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला .
बारामतीच्या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या सभांमध्ये मी कुठून निवडणूक लढविणार ? कि लढविणार नाही , हे योग्य वेळ आल्यावर सांगेन असा “सस्पेन्स” प्रकाश आंबेडकरांनी निर्माण केला होता तो आजही कायम आहे. अर्थात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात युती होणार कि नाही हे सुद्धा अद्याप स्पष्ट नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आधी १२, नंतर २२ जागांची मागणी करणे आणि त्यातही बारामती ,माढा, नांदेड आणि सोलापूर या जागा मागणे त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो अशीच र्चाआहे.
मुंबईच्या वंचित आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकी नंतर वंचित आघाडीचे नेते प्रा. लक्षण माने यांनी ११ ते १३ तारखेच्या दरम्यान राहुल गांधी यांची भेट होईल अशी माहिती दिली होती. या भेटीनंतर आणि चर्चनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.