मुंबई उत्तर-मध्य मधून प्रिया दत्त पुन्हा लढण्यासाठी मैदानात

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी राहुल गांधी यांचे ऐकले असून त्या लोकसभा निवडणूक लढण्यास तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे प्रिया दत्त यांनी राहुल गांधी याना पत्र लिहून लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे म्हटले होते. प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेसचे नेते सुनील दत्त यांच्या कन्या आहेत.

Advertisements

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी हे नुकताच महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येऊन गेले होते. याच दरम्यान त्यांनी प्रिया दत्त यांना पुन्हा एकदा निवडणूक लढण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर दत्त यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षांतर्गत कलहामुळे प्रिया दत्त यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी पक्षासाठी काम करणार असल्याचे म्हटले होते. २०१४ च्या निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता.

Advertisements
Advertisements

त्यावेळी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या विजयी झाल्या होत्या. प्रिया दत्त यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसला उमेदवार शोधण्यास मोठी कसरत करावी लागली होती. मात्र प्रिया दत्त या पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास राजी झाल्यानंतर काँग्रेसने सुटकेचा नि:श्वास घेतल्याचे बोलले जात आहे. मुंबईत चौथ्या टप्प्यात (२९ एप्रिल) मतदान होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!