Aurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील

महाराष्ट्रात पक्षाचे अस्तित्व राहावे आणि ज्या शहरात एमआयएमचे प्राबल्य आहे त्या शहरात तरी लोकसभा निवडणूका लढवाव्यात ही पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे आणि औरंगाबाद शहरात एम आय एम चे २५ नगरसेवक आहेत त्यामुळे औरंगाबाद लोकसभा लढविण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रात एक किंवा दोन जागा वंचित बहुजन आघाडीने सोडाव्यात अशी आमची मागणी असल्याची माहिती एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील यांनी “महानायक ऑनलाईन” शी बोलताना दिली.
आ. जलील पुढे म्हणाले की, पक्ष प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे जे वक्तव्य केले होते ते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सन्मानार्थ केले होते. त्यांची काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी होण्यात आमच्या मुळे अडचण होत असेल तर आम्ही एकही जागा लढविणार नाही असे म्हटले होते, मात्र आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे आम्ही एक किंवा दोन जागा मागणार आहोत अर्थात याचा निर्णय आमच्या पक्षप्रमुखांना घ्यायचा आहे.
आपण स्वत: औरंगाबाद लोकसभा लढविण्यास इच्छुक आहात का ? असे विचारले असता ते म्हणाले की, प्रकर्षाने आदेश दिला तर माझी तयारी आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीसाठी वादाचा मुद्दा झाला आहे कारण या जागेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परभणी च्या सभेत परिवर्तनवादी विचारवंत निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनीही आपण औरंगाबाद लोकसभा लढविणार असल्याचा निर्धार केला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी आपण या वादावर ओवेसींच्या यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे म्हटले आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात mim चे उमेदवार दिले आहेत
वंचित बहुजन आघाडी इंजि. मुहम्मद कमाल हाशिम धुळे लोकसभेचे उमेदवार
Thanks .