सुजयच्या गिरीश महाजन भेटीवरून सेनेचा विखे पाटलांवर बाण …

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ईडीची पीडा टळावी म्हणूनच मुलगा सुजयला भाजपा मध्ये पाठवले का? असा उपहासात्मक प्रश्न शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी विचारला आहे. सुजय हे सध्या गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करत आहेत अशी बातमी समोर आली आहे. त्यामुळेच मनिष कायंदे यांनी हा उपहासात्मक प्रश्न विचारला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते कमी आणि शासनाचे दूत म्हणूनच जास्त कार्यरत होते, हे आपण गेली काही वर्षे अनुभवले आहे. भाजपा शासनाची विरोधी पक्ष नेत्यांनी मदत करण्यामागेही त्यांचा एक पाय भाजपात आणि एक पाय काँग्रेसमध्ये आहे. आपल्यावर ईडीची कारवाई तर होणार नाही ना? अशी भीती त्यांना वाटते आहे असेही मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर खुलासा दिला आहे, वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतील तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार मंत्री महोदयांनी आज त्यांना भेटीसाठी वेळ दिली होती असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्यावर ईडीची पिडा टाळण्यासाठीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलगा सुजयला भाजपात धाडले का? असा उपरोधिक प्रश्न शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी विचारला. ही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगलीच झोंबली. म्हणूनच त्यांनी या टीकेवर एक खुलासा दिला. मात्र हा खुलासा म्हणजे ताडाच्या झाडाखाली उभं राहून पाणी प्यायलो असे म्हणण्यासारखा प्रकार आहे असे म्हणत मनिषा कायंदे यांनी पुन्हा एकदा टोलेबाजी केली आहे.