Aurangabad : बहुचर्चित न्या . कोळसे पाटलांच्या जागेबाबत काय म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे नेते ?

बहुचर्चित औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा वंचित बहुजन आघाडीने लढविण्याचा निर्णय घेतला असून आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथे घोषित केल्याप्रमाणे न्या.बी. जी. कोळसेपाटीलच लढतील अशी अधीकृत माहिती आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी महानायक ऑनलाईनशी बोलताना दिली आहे. वंचित बहुजन आघडीनें घोषित केलेल्या उमेदवाराला एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध जाहीर केला असून औरंगाबादची एक जागा एमआयएमला सोडावी अशी मागणी केली असल्याने आघाडीची काय भूमिका राहील?या विषयी बोलताना माने म्हणाले कि, बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः हि जागा न्या. कोळसेपाटील यांना घोषित केल्याने एमआयएम कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.एमआयएम नेतृत्वाच्या संमतीनेच हि जागा घोषित करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगायचे ? हा निर्णय एमआयएमचा आहे. न्या. कोळसेपाटील हेच आमचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार असतील यात शंका नाही.