प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हव्यात “या ” महत्वाच्या “चार” जागांसह २२ जागा , जाणून घ्या …

वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत २२ ठिकाणी लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता आम्ही या ठिकाणीचे उमेदवार मागे घेऊ शकत नाही, असा मुद्दा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत मंडळाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी महानायक ऑनलाईनशी बोलताना सांगितले . वंचित बहुजन आघाडीला जे मतदारसंघ हवे आहेत त्यात अशोक चव्हाणांचा नांदेड, शरद पवारांचा माढा, सुप्रिया सुळे यांचा बारामती आणि सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस- राष्ट्रवादी मागील सलग तीन लोकसभेच्या जागा हारलेले मतदारसंघ आम्हाला सोडावेत आमचा आग्रह असल्याचेही माने म्हणाले.
काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे नेते व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांत आज दुपारी मुंबईत जागावाटपाबाबत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार माजिद मेमन, शिवाजी गर्जे तसेच वंचित आघाडीकडून लक्ष्मण माने आणि अशोक सोनवणे आदी नेते उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर राहुल गांधींशी चर्चा करणार
लक्ष्मण माने पुढे म्हणाले कि , राज्यातील आघाडीच्या नेत्यांकडून प्रश्न सुटणार नसल्याने प्रकाश आंबेडकर पुढील आठवड्यात काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. १० ते १२ मार्च च्या दरम्यान नवी दिल्लीत आंबेडकर राहुल यांची भेट घेतील. त्यानंतरच आघाडीबाबत निर्णय होईल, मात्र हि चर्चा औपचारिक असेल. संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या मुद्द्याचे काय झाले या विषयी बोलताना ते म्हणाले कि, सरदार वल्लभभाई पटेल यांनी याविषयी अतिशय स्पष्ट करारनामा संघाशी ७०वर्षां पूर्वी केला होता. त्यामुळे हाच करार बेसिक मानून या मुद्द्यावर पुढे जाता येईल . शिवाय याबाबतचा मसुदा तयार करण्यासाठी आमचे दोन सदस्य आमची देण्याची तयारी आहे. शिवाय निवडणूका झाल्यानंतर आघाडीतील कोणीही भाजपसोबत जाणार नाही याची हमी आम्हाला हवी आहे.
तुमची आधीची १२ जागांची मागणी होती आता २२ कशा झाल्या ? या प्रश्नाचे उत्तर देताना माने म्हणाले आम्ही त्यांना १२ जागा मागितल्या तेंव्हा त्यांनी २-४ जागा मिळतील असे सांगितले पण निर्णय कुठलाही दिला नाही . आता चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडूनच उशीर होत आहे . दरम्यानच्या काळात आमचे २२ उमेदवार आम्ही जाहीर केले त्यामुळे आता माघार घेणे आम्हाला अशक्य आहे . आम्ही आमचे आहेत आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे . किंबहुना आता त्यांच्याशी युती होणे कठीणच आहे कारण आम्ही खूप पुढे निघून गेलो आहोत. आमची आघाडी गरीब माणसांची आहे. जहागीरदारांची नाही, म्हणून निवडणुकांची तयारी करता यावी म्हणून आम्ही २२ जागांचे उमेदवार ठरवले आहेत.
Very nice,congratulation
Thanks. Keep in touch