Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चुन-चुन कर बदला लेगा और जरूरत पड़ी तो दुश्मन के घर जाकर भी हिसाब चुकता करेगा : नरेंद्र मोदी

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पुन्हा लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. दहशतवादासमोर भारत झुकणार नाही. आता टिपून-टिपून बदला घेऊ. गरज पडल्यास शत्रूला घरात घुसून मारू, असं मोदींनी पाकला ठणकावलंय. अहमदाबादमध्ये आयोजित एका जाहीर सभेत मोदी बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरामधील हवाई दलाच्या कारवाईवरून राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांवरही मोदींनी यावेळी निशाणा साधला.

विरोधी पक्षांवर थेट हल्ला करताना मोदी म्हणाले कि , काही राजकीय नेत्यांची वक्तव्यं ही पाकिस्तानातील वृत्तपत्रांचे मथळे बनतात हे देशाचं दुर्दैवं आहे .  पाकिस्तानच्या संसदेत त्यावर चर्चा होते. पाकिस्तान टाळ्या वाजवेल अशी वक्तव्य विरोधी पक्षाचे नेते करतात म्हणून लष्करावर प्रश्न उपस्थित करू नका. देशाच्या जवानांना बदनाम करू नका. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचेत ते मला विचारा. देशाच्या सैन्याने आपली ताकद दाखवली आहे. आता आणखी वाट पाहणार नाही. टिपूण-टिपूण शत्रूला मारू,असं मोदी म्हणाले. आता आम्ही शत्रूला त्याच्या घरात घुसून मारू. गेल्या ४० वर्षांपासून भारत दहशतवादाचा सामना करतोय. पण मतांच्या राजकारणात आकंठ बुडालेले दहशतवाद्याविरोधात कारवाई करण्यास घाबरत होते. मात्र, मला सत्तेची परवा नाही. मला देशाची आणि देशातील नागरिकांची चिंता आहे. देशहितासाठी जे काही पाउल उचलावं लागेत. ते मी नक्कीच उचलेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!