सुपारीबाज ट्रोलर्सना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर

सुपारीबाज ट्रोलर्सना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीला आणि मला सुपारी घेऊन ट्रोल करणा-या सुपारीबाज ट्रोलर्सना बिनधास्त ठोकून काढण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
ही हुकुमशाही नाही काय ? असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही आमचा पक्ष चालवतो, आमची काही भूमिका आहे. माध्यमातील लोकांनी यासंदर्भात काही विधायक टीका केली तर मी समजू शकतो पण सोशल मिडियावर काही भाडोत्री आणि सुपारीबाज ट्रोलर्स जर आमच्या बाबत काही खोटे नाते लिहित असतील तर अशा लोकांना ठोकून काढा असा आदेश मी पक्षप्रमुख म्हणून देत आहे आणि त्यात काहीही वावगे नाही.
माध्यमातील लोकांनी लिहिले तर आपली काय भूमिका असेल यावर ते म्हणाले आमच्यावरील विधायक टीका मी समजू शकतो पण सुपारीबाज आणि ट्रोलर्सला आपला हा इशारा आहे. मध्यंतरी एकाने माझी १० कोटींची प्राॅपर्टी आहे म्हणून लिहिले, मी म्हटले कुठे आहे ती माझी प्राॅपर्टी मला दाखव ना ? मुख्यमंत्री निधीला देऊन टाकतो. हे कसे सहन करणार ? माझ्या जागी येऊन विचार करा म्हणजे समजेल.