समीर विद्वंस आता सावित्रीबाई फुलेंची गाथा आणणार रुपेरी पडद्यावर

सामाजिक विषमतेच्या विरोधात उभे ठाकून स्त्री शिक्षणाचे व पर्यायानं स्त्रीमुक्तीचे दार उघडणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्राबाई फुले यांचा जीवनसंघर्ष लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ यांचा जीवनपट यशस्वीरित्या रुपेरी पडद्यावर साकारणारा दिग्दर्शक समीर विद्वांस पुन्हा एकदा हे शिवधनुष्य उचलणार आहे.समीर विद्वांस यानं स्वत:च सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. ‘आपल्याला इतिहास नीट शिकवलाच गेला नाही. इतिहासाच्या सनसनावळ्यातच आपण अडकून राहिलो. अनेक थोर व्यक्तिमत्त्वांशी आपली ओळखच झाली नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे त्यांच्यापैकीच एक असून त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर मी हेलावून गेलो आहे. ‘ज्योतिबासावित्री’ची गाथा आपण आधीच सांगायला हवी होती. पण उशीर झालेला नाही. मी काम सुरू केलंय,’ असं समीरनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.