अमिताभ- नागराज यांचा ‘झुंड’ येत्या २० सप्टेंबरला

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आणि नागराज मंजुळे याचे दिग्दर्शन या भन्नाट समीकरणामुळे चाहते आगामी ‘झुंड’ चित्रपट येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फूटबॉल शिकवतात. या चित्रपटात या शिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी तारखा उपलब्ध नसल्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. नंतर कॉपीराईटसंबंधित काही अडचणींचादेखील सामना ‘झुंड’ला करावा लागला होता.