Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोण होता हा आदिल अहमद दार ?

Advertisements
Advertisements
Spread the love

“त्याच्या” नातेवाईकांनाही “त्याची” लाज वाटते …
पुलवामा येथील आत्मघाती ह्ल्ला घडवून आणणार आदिल अहमद दार हा काश्मीरमधील एका गावातील रहिवासी होता.त्याने केलेल्या या कृत्याबाबत प्रतिक्रिया देताना त्याचा नातेवाईक अब्दुल रशिद म्हणला की, ”कुठल्याही व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यावर कुणाला आनंद होईल ?  आदिल याने लहानपणीच आपले शिक्षण सोडले होते. तो मोलमजुरी करत असे. गेल्यावर्ष मार्च महिन्यात तो भाऊ समीर दारसह मित्रांना भेटायला जातो असे सांगून, बेपत्ता झाला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई-वडलांनी पोलिसांत माहिती दिली होती. तसेच दहशतवादाचा मार्ग सोडून परत येण्याचे आवाहनही केले होते. मात्र तो माघारी फिरला नाही.”
हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार असल्याची माहिती मिळताच  त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे त्याच्या या कृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे. आदिल हा एवढा कट्टर दहशतवादी बनेल असे वाटले नव्हते. २०१६ मध्ये बुऱ्हाण वानीच्या मृत्यूनंतर दगडफेक करत असताना त्याच्या पायात पेलेट गनची गोळी लागली होती. त्यानंतर तो कट्टक दहशतवादाकडे वळला, असेही आदिलच्या या नातेवाईकाने सांगितले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!