कपिल शर्मा शोमधूनअखेर नवज्योत सिंग सिद्धू आऊट
Advertisements
Advertisements
‘दहशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा’ अशी मवाळ भाषा वापरत पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी संतापले होते. नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिला होता. अखेर कपिल शर्मा शोमधून सिद्धू यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Advertisements
