महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आशिष बारकूल पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आशिष बारकूल पहिला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याने चांगली बाजी मारली असून बार्शी तालुक्यातील आशिष बारकूल हा राज्यात पहिला आला आहे. महिलांमधून पुण्याच्या स्वाती दाभाडे या तर मागासवर्गीयातून सोलापूरचाच महेश जमदाडे प्रथम आला आहे.