मातृतिर्थचा प्रेरणादायी विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंदखेड राजा विकास आराखड्यातील विकास कामांचे भूमिपूजन
मॉ जिजाऊंनी स्वराज्यांची बिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात बालपणापासूनच रुजविली. त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळेच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले. हा गौरवशाली इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रेरणा मिळेल, असा मातृतिर्थचा विकास करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंदखेड राजा येथे केले.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय यांच्यामार्फत मातृतिर्थ मॉ जिजाऊ साहेब सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात करण्यात आले होते. त्यावेळी राजमाता जिजाऊ विद्यालयाच्या प्रांगणावर मुख्य कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, ॲड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष नाझेर काझी, जि.प सभापती श्वेता महाले, माजी आमदार धृपदराव सावळे, तोताराम कायंदे, विभागीय आयुक्त पीयुष सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपस्थित होते.