अझीम प्रेमजी यांना जीवनगौरव पुरस्कार

तर सिद्धार्थ लाल यांना ‘एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर’
राष्ट्र ऊभारणीत उद्योग क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. यातूनच वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जग भारताकडे आकृष्ट होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
ईवाय प्रस्तुत ईवाय एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर 2018 हे पुरस्कार मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक विप्रो समुहाचे प्रमुख अझीम प्रेमजी यांना जीवन गौरव पुरस्कार तर आयशर मोटर्सचे सिद्धार्थ लाल यांना एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीत खंबीर नेतृत्व म्हणून कामगिरी बजावत असल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचेही उद्योजकांच्यावतीने उभे राहून, टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक राजीव मेहरोत्रा, उदय कोटक आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात इनोव्हेटीव्ह स्टार्टअप संवर्गात बायजूच्या रवींद्र बायजू, कंझ्युमर प्राॅडक्ट अॅण्ड रिटेलमध्ये जग्वार समुहाचे राजेश मेहरा, मॅन्युफ्क्चरिंगमध्ये मिंडा इंडस्ट्रीजचे निर्मल मिंडा, लाईफ सायन्स अँण्ड हेल्थ केअरमध्ये इन्टास फार्मास्युटीकलचे दिनेश चुदगर, फायनान्शीअल सव्हिर्सेसमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक संजय अगरवाल, सर्व्हिसेसमध्ये ओयोचे रितेश अगरवाल, एनर्जी अँण्ड इन्फ्रास्टक्चर्समध्ये फिनिक्स मिल्सचे अतुल रूईया, एन्टरप्र्येन्युअल सीईओसाठी टायटनचे भास्कर भट्ट, बिझनेस ट्रान्सफर्मेशन संवर्गामध्ये फ्युचर्स समुहाचे किशोर बियाणी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.