Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडी राज्यात लोकसभा लढवणार

Spread the love

संघाला संविधानाच्या चौकटीत आणणाऱ्यांशीच आघाडी करू
अॅघड. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

हिंगोली : राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक लढवणार असून हिंगोलीतही आघाडीच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात उभा केला जाणार असल्याचे
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांनी स्पष्ट करून केंद्र शासन अविवेकाने वागत असल्याचा आरोप केला.

सत्ता संपादन मेळाव्याच्या निमित्ताने अॅरड. आंबेडकर मंगळवारी हिंगोलीत आले होते. त्यांची रामलीला मदानावर जाहीर सभा झाली. तत्पूर्वी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शेख युसूफ, फेरोजलाला, हरिभाऊ जाधव, जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख, रवींद्र वाढे, वसंत खंदारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अॅंड. आंबेडकर पुढे म्हणाले, की लोकसभा निवडणुका जवळ येत असताना केंद्र शासन हुकूमशाही पद्धत राबवत आहे. केंद्र शासनाची ही पद्धत चुकीची असून देशाला हुकूमशहा नव्हे तर सहजीवन जगणारा पंतप्रधान पाहिजे, असे ते म्हणाले. बहुजन वंचित आघाडीचा लढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आहे. कोलकता येथील प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था हा संविधानाच्या नियमाप्रमाणे राज्याचा विषय आहे. एखाद्या राज्यात कारवाई करायची असेल, तर सीबीआयला त्या राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वीच पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश सरकारने ही परवानगी काढून घेतली होती. मात्र त्यानंतरही केंद्र सरकारने संवैधानिक मार्ग न अवलंबता स्वत:ला लादण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. कोलकत्याचा एपिसोड हे केंद्राचे नाटक आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्याची आहे. पश्चिम बंगालमध्ये कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र एक कागद बनला की तो पाच विभागांना जातो. राज्य ऐकत नसेल तर योग्य पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयात जाता येते. संविधानाने एककल्ली व सर्वोच्च अधिकार कोणाला दिले नाहीत. एकमेकांचे नियंत्रण ठेवले आहे. त्यापैकीच सर्वोच्च न्यायालय हे एक आहे. परंतु केंद्र सरकारकडून सीबीआयला हत्यार बनवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बंदिस्त पोपट असे ताशेरे त्यावर ओढले आहेत. ममता बॅनर्जी यांनी कायदेशीर कारवाई केली असताना सीबीआयचा वापर केंद्राकडून सुरू असलेली ही असंवैधानिक कारवाई निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक लढवणार असून हिंगोलीतही आघाडीच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात उभा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!