आंबेडकर -गांधी यांची कोणतीही भेट ठरलेली नाही : अमित भुईगळ

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
औरंगाबाद : भारिप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेड़कर यांचे राजकीय वलय वाढ़त असल्याने त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण होईल अशा अफवा पसरविल्या जात असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे कि , राहुल गांधी आणि बाळासाहेब आंबेड़कर यांची कोणतीही भेट ठरलेली नसल्याने ती होण्याचा प्रश्नच उध्दभवत नाही . याबाबत काही लोक मुद्दाम चुकिचे मेसेज पाठवून संभ्रम निर्माण करत आहेत. दि। 09/02/2019 रोज़ी बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे जेष्ठ नेते राजु लोखंडे यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला नागपूर येथे उपस्थित राहणार आहेत. हा एक खोडसाळ प्रचार असून या अफवांना कोणीही बळी पडु नये असे आवाहन त्यांनी केले आहे.