Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KarnatakElectionUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसला शुभेच्छा

Spread the love

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होताच या यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचं कौतुक केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा! असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत.


आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं आहे की ,कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो, असं मोदी म्हणाले. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू आणि भाजपलाही पुढील वाटचालीसाठी बळ दिले आहे.

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे आणि काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील या विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. दक्षिणेतील एकमेव आणि मोठं राज्य असलेल्या कर्नाटकातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः कर्नाटकात २० हून अधिक जाहीर सभा घेतल्या होत्या, बरेच रोड शो केले होते. कर्नाटकात प्रचारादरम्यान बजरंग बली आणि द केरला स्टोरी चित्रपटासारखे धार्मिक आणि जातीय मुद्दे जाणीवपूर्णक भाजपने प्रचारात आणले होते. पण भाजपच्या या प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही आणि कर्नाटकात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!