Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नेपाळमधील विमान दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू

Spread the love

नेपाळमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ७२ जणांना घेऊन जाणारे यति एअरलाईन्सचे विमान पोखरा विमानतळाजवळ कोसळले. बचाव दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे विमान अपघातग्रस्त होताच विमानाला भीषण आग लागली. बचाव दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असून या विमानात ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुले होती. अपघाताच्या वेळी विमानात ५३ नेपाळी, पाच भारतीय (विमान अपघातामध्ये पाच भारतीयांचा मृत्यू झाला आहे. संजय जायसवाल, सोनू जायसवाल, अनिल कुमार राजभर, अभिषेक कुशवाह आणि विशाल शर्मा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.), चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता,” अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विमान दुर्घटना घडलेल्या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, अपघातानंतर विमानाला आग लागली होती.
नेपाळच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथेरिटी (CAAN) नुसार, यति एअरलाईन्सचं विमान 9N-ANC-ATR-72 ने राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन एयरपोर्टवरुन सकाळी १०.३३ वाजता उड्डान घेतली होती. खराब हवामानामुळे विमानाला फोखरा एअरपोर्टवर लँड करावे लागले पायलटने एटीसीसोबत लँडिंगकडून परवानगी घेतली होती. पोखरा एटीसीने लँडिंगला परवानगीही दिली होती. विमानतळ प्रशासनाने तांत्रिक खराबीमुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
सिव्हिल एव्हिएशन ऑथेरिटीच्या मते, लँडिंगच्या आधी विमानाला आग लागली होती. त्यामुळे हवामान खराब असल्यामुळे विमान कोसळले हे चुकीचे आहे.

या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी आपतकालीन बैठक बोलवली असून एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच बचावकार्य वेगात करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

 


पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, मोठी दुर्घटना टळली

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

#Nepal #Planeaccident #PlaneCrash #MahanayakNews #NewsUpdate #CurrentNews #MahanayakOnline #MahanayakNews

आपलं सरकार

Click to listen highlighted text!