Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही

Spread the love

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावरून आरोप करणाऱ्या विरोधकांना विधानसभेत सुनावले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही. जसे कर्नाटक म्हणत आहे, तसेच आपणही इंच इंच लढू. सर्वोच्च न्यायालय असेल किंवा केंद्र सरकार असेल, सीमाभागातील मराठी भाषकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधानसभेत दिली आहे.

हिवाळी अधिवेशन, विधानसभात आज सीमावादाच्या प्रश्नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते. अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कर्नाटकने ठराव आणला आणि कारण नसताना सीमावाद चिघळला, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका, असा गंभीर इशारा महाराष्ट्राने दिला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान, या विषयावर सभागृह एक आहे. आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचे नाही, आपल्याला एक राहायचे आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या गदारोळावर स्पष्ट केले आहे. तसेच कर्नाटकविरोधात आपले ठराव आणण्याचे ठरले होते. मागच्या आठवड्यातले वातावरण जरा गंभीर होते. त्यामुळे तो आणता आला नाही. आज तो आणण्याचा निर्णय होता. पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रण आले आणि महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले. मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला गेलेत, ते दुपारी परतणार आहेत. मुख्यमंत्री आज दुपारपर्यंत येतील. शक्य झाल्यास आज नाहीतर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे मांडू. यासंदर्भात महाराष्ट्राचे सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

 

आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा म्हणतात, मग न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार?


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!