Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#ExamsUpdates | लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा महाराष्ट्र

Spread the love

#ExamsUpdates | लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरिता विविध संवर्गासाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येणार आहे. विविध विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ, प्रशासकीय अधिकारी गट ब व सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब संवर्ग करिता एकत्रितरीत्या चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकत्रित चाळणी परीक्षा मधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल, तसेच एकत्रित परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव दक्षता, धोरण व संशोधन यांनी सांगितले आहे.

या परीक्षेची माहिती उदा. शासनाचा विभाग, संवर्ग, परीक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षेची तारीख यासंदर्भातील सविस्तर माहिती लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

#ExamsUpdates

 

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!