Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratNewsUpdate : मोठी बातमी : मोरबीत झुलता पूल कोसळला , ६० जणांचा मृत्यू , १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची भीती ….

Spread the love

गुजरातचे मंत्री ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले की, मोरबी केबल ब्रिज कोसळल्याने ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताची जबाबदारी गुजरात सरकारने घेतली आहे. सध्या बचावकार्य सुरू  असून या घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.


गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले. माझे आगामी सर्व कार्यक्रम रद्द करून मी आज मोरबीला निघत आहे. याआधी हा पूल नूतनीकरणासाठी ६ महिने बंद ठेवण्यात आला होता. दोन कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करून नवीन वर्षाच्या दिवशी हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. सुमारे दोनशे वर्षे जुना असलेला हा पूल राजेशाही काळात बांधण्यात आला होता.

बचावकार्यासाठी राजकोट अग्निशमन विभागाच्या सात पथकांना पाचारण करण्यात आले आहे. एसडीआरएफ टीम व्यतिरिक्त बोटीसह टीम्सनाही बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. राजकोट शहर आणि जिल्ह्यातील रुग्णवाहिकाही मोरबीसाठी मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय कच्छमधून जलतरणपटू मागवण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. गांधीनगर येथून एनडीआरएफच्या दोन तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत.

अहमदाबाद : पाच दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आलेला  गुजरातच्या मोरबी येथील मच्छु नदीवरील झुलता पुल कोसळला असल्याचे वृत्त आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूल कोसळला तेव्हा सुमारे ५०० लोक त्यावर होते, असे सांगण्यात येते. घटनास्थळी बचावकार्य जोरात सुरू आहे. वृत्तानुसार,  जवळपास १०० लोक अजूनही पाण्यात अडकल्याची भीती आहे. दुरुस्तीनंतर हा पूल खुला करण्यात आला होता. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू असून, जीवितहानीबाबत कुठलीही माहिती अद्याप उपलब्ध नाही.


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथील अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना PMNRF कडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. प्रत्येक जखमीला ५०,००० रुपये दिले जातील.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी मोरबीला रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी आज गुजरातमध्ये होते. त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. राजकोट, कच्छ येथून एसडीआरएफचे पथक, अग्निशमन दल, स्टीमर तात्काळ मोरबीला पाठवले जात आहेत.

अनेक वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक पूल…

मोरबी केबल ब्रिज हा अनेक वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक पूल होता. दुरुस्ती आणि जीर्णोद्धार केल्यानंतर, गुजराती नववर्षानिमित्त २६ ऑक्टोबर रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. वृत्तानुसार, पुलाच्या नूतनीकरणाची सरकारी निविदा ओधवजी पटेल यांच्या मालकीच्या ओरेवा ग्रुपला देण्यात आली होती.

परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथील अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बचाव कार्यासाठी तातडीने पथके तैनात करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे.

अमित शहा यांच्या प्रशासनाला सूचना

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही  मोरबी येथील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या संदर्भात गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी आणि इतर अधिकाऱ्यांशी बोलल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक प्रशासन पूर्ण तयारीनिशी मदतकार्यात गुंतले आहे.
एनडीआरएफही लवकरच घटनास्थळी पोहोचत असल्याचं अमित शाह यांनी म्हटले  आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी यांचा संदेश …

दरम्यान भारत जोडो यात्रेअंतर्गत पदयात्रा करत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही  मोरबी घटनेवर फेसबुकवरून शोक व्यक्त केला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की , गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेची बातमी अत्यंत दु:खद आहे. अशा कठीण प्रसंगी मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच, मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, अपघातात जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करावी आणि बेपत्ता लोकांच्या शोधात मदत करावी.

https://www.facebook.com/rahulgandhi/posts/701365971349481

याशिवाय आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते राघव चढ्ढा यांनी मोरबी घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राघव चढ्ढा म्हणाले की, गुजरातमधील मोरबी येथे पूल तुटल्याची बातमी ऐकून मन खूप दुःखी झाले आहे. सर्व पीडितांसाठी परमेश्वराची प्रार्थना.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!