Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : निवडणूक आयोगाने शिवसेनेचा केला नाम विस्तार !! शिवसेनेच्या दोन गटांच्या नावांना दिली मान्यता…

Spread the love

नवी दिल्ली : शिवसेनेच्या सत्तेसाठी दोन गटांमध्ये भांडणे होत असताना निवडणूक आयोगाने पक्षाचे फक्त “शिवसेना” हे  नाव आणि चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर दोन्ही गटांना नवीन नाव देऊन एक प्रकारे ” शिवसेने”चा नाम विस्तार करून दोन गटात शिवसेनेची अधिकृत विभागणी केली आहे . त्यानुसार शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आता “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या नावाने ओळखला जाणार असून त्याचे नवे पक्ष चिन्ह “मशाल” असेल.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” म्हटले जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.


ShivsenaNewsUpdate : दरम्यान निवडणूक आयोगाने दोन्हीही गटांना आपापल्या पक्षाच्या नावांचे आणि निवडणूक चिन्हांचे तीन नवीन पर्याय देण्यास सांगितले होते त्यानुसार निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिले आहे परंतु शिंदे गटाला पक्षाचे चिन्ह वाटप करणे बाकी आहे. यापूर्वी शिंदे गटाने प्रस्तावित केलेली गदा आणि त्रिशूळ ही धार्मिक चिन्हे असल्याने निवडणूक आयोगाने फेटाळली आहेत.

शिवसेनेच्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक आयोगाने घातलेल्या बंदीला आज उद्धव ठाकरे यांनी प्रतिस्पर्धी गटांमधील भांडणाच्या पार्श्वभूमीवर आव्हान दिले होते. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी शनिवारच्या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि पक्षाचे नाव आणि चिन्ह सुनावणी न घेता गोठवले गेले आहे, जे “नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध” आहे असे म्हटले आहे.

मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातील ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ठाकरे आणि प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे गटाला नवीन नावे आणि चिन्हे निवडण्यास सांगितले होते.

ShivsenaNewsUpdate : शिवसेनेच्या चिन्हावरून टीम उद्धव आणि टीम शिंदे यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. उद्धव ठाकरे वडिलांचा पक्ष असल्याचा दावा करत होते. त्याचवेळी सीएम शिंदे म्हणाले की, लोकशाहीत ज्याच्याकडे बहुमत आहे त्याचाच पक्ष असतो आणि सध्या आपल्याकडे बहुमताचा आकडा आहे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर दोन्ही पक्षांना पूर्वीच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!