Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ज्ञानवापी मशिद प्रकरण : अहवाल सादर करण्यासाठी याचिकाकर्त्यांना हवाय वेळ …

Spread the love

वाराणसी : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत तीन दिवस सर्वेक्षण पॅनेलमध्ये सहभागी असलेल्या वकिल आयुक्तांनी आज सर्वेक्षण अहवाल न्यायालयात दाखल करणार नसल्याचे सांगितले आहे. याबात बोलताना अधिवक्ता आयुक्त अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, आम्ही स्वतंत्र अहवाल दाखल करणार नाही, परंतु तिन्ही लोक मिळून अहवाल दाखल करतील. त्यासाठी न्यायालयाकडून सोमवारपर्यंत वेळ मागता येईल. तत्पूर्वी, वाराणसी न्यायालयाने अधिवक्ता आयुक्तांना 17 मे रोजी सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास सांगितले होते.


एनडीटीव्हीशी विशेष संवाद साधताना सिंह पुढे म्हणाले कि , “न्यायालयाच्या आदेशानुसार, 14 ते 16 मे दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ज्ञानवापी मशीद संकुलाचे व्हिडिओग्राफी-सर्व्हेचे काम करण्यात आले. सर्वेक्षणाशी संबंधित अहवाल 17 मे रोजी न्यायालयात सादर केला जाणार होता, परंतु त्यासाठी आम्ही न्यायालयाकडून वेळ मागणार आहोत. ते पुढे म्हणाले की, “आम्ही आज (मंगळवार) हा अहवाल न्यायालयात सादर करत नाही कारण तो तयार नाही. न्यायालय जे काही वेळ देईल त्या वेळेत आम्ही अहवाल सादर करू.”

सोमवारी (१६ मे) ज्ञानवापी मशिदीत तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी केलेल्या पाहणीत मशिदीच्या आवारातील विहिरीतून शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यावर कनिष्ठ न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला ज्या ठिकाणी ‘शिवलिंग’ सापडल्याचा दावा केला आहे, ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, भारतातील मुस्लिमांची प्रमुख संघटना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत कथित शिवलिंग सापडल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीत वुजू खाणे बंद करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण घटना हा जातीय उन्माद असल्याचे सांगत, हा एक षडयंत्राचा भाग आहे. पाण्याच्या कारंज्याला ते शिवलिंग समजत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!