Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुबई पोलिसांकडून 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश

Spread the love

मुंबई  :  मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी  आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलिसांनी काढलेल्या या आदेशानुसार  पाच किंवा त्याहून अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. तसेच या कालावधी दरम्यान  ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांनी म्हटले आहेत.

बृहन्मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा आदेश काढला आहे. यानुसार आता पाच किंवा त्याहून अधिक नागरिकांना एकत्र जमा होता येणार नाही  तसेच मोर्चाही काढता येणार नाही. मिरवणूक, वरात, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे.  ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडण्यासही  प्रतिबंध केल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे.

गेल्या आठवड्याभरात भाजपकडून दोनवेळा मोर्चे काढण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी भाजपने एक मोर्चा काढला होता आणि त्यानंतर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी एक मोर्चा काढला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून हे आदेश काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!