Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : सावधान !! चीनमध्ये कोरोनाचे पुनरागमन , दीड हजाराहून अधिक विद्यार्थी विलगीकरणात

Spread the love

बीजिंग : भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी देशातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण ज्या चीनमधून कोरोना व्हायरस पसरला, त्याच चिनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे पुनरागमन होत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासात चीनमध्ये ३२ नवीन रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २५ रुग्ण हे एकट्या दालियान प्रांतातील आहेत. याविषयीच्या वृत्तानुसार चीनमधील एका विद्यापीठात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथील तब्बल १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी कि , चीनच्या दालियान प्रांतातील उत्तर-पश्चिम शहरात असलेल्या झुनगाझे विद्यापीठात गेल्या २४ तासात २५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे विद्यापीठ परिसर सील करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये देखरेखीत ठेवण्यात आले असून त्यांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान कोरोनासंदर्भात चीनने गंभीरपणे पावले उचलले असून ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील, तेथे ताबडतोब लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर चीनमध्येही कोरोनाविरोधातील लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये गेल्या वर्षीच कोरोना जवळपास आटोक्यात आल्याचा दावा करण्यात येत होता परंतु चीनच्या अनेक भागांत कोरोना संसर्गाची प्रकरणे पुढे येत आहेत. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ९८,३१५ रुग्ण आढळले असून ४,६३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!