AurangabadNewsUpdate : न्यायालयातील खटल्याच्या कागदपत्रात खाडाखोड , ११ वर्षांनी मिळाला या दाम्पत्याला न्याय !!

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद :  अनादरीत धनादेशाचा खटला चालू असताना न्यायालयातील सदर खटल्याच्या  संचिकेतील मुद्रांकावर खाडाखोड केल्याच्या आरोपातून  प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी  ए. जे. पाटील यांच्या न्यायालयाने फीनिक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या संचालिका सुनीता कोरडे व त्यांचे पती  मोहन कोरडे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे तब्बल ११ वर्षांपासून हा खटला चालू होता. 

Advertisements

या बाबतीत अधिक माहिती अशी की, अॅड.. बिभीषण रावणराव जायभाय , रा . जय भवानी नगर औरंगाबाद हे इंग्रजी शिकण्यासाठी फीनिक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये विद्यार्थी म्हणून २००३ या वर्षी येत होते. वकील बिभीषण जायभाय व कोरडे दाम्पत्यात २००७  पासून अनादारीत धनादेशाचा खटला चालू आहे, सदर खटल्यातील मुद्रांक पेपरवर खाडाखोड करून, न्यायालयासमोरील पुरावे न्यायालयातील कर्मचारी व वकिलाशी संगनमत करून  आरोपातून सुटण्याचा गुन्हा केल्याचा फौजदारी खटला बिभीषण जायभाये याने २००९ मध्ये दाखल केला होता . या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्षाचा कारावास व दंड होता

Advertisements
Advertisements

दरम्यान आरोपी कोरडे दाम्पत्याच्या  वतीने अॅड.  चेतन जाधव यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले  की,  सदरील फौजदारी खटला हा बिनबुडाचा असून सूड बुद्धीने दाखल दाखल केला गेला आहे.  शेवटी  न्यायालयाने सुनावणीअंती श्री व सौ कोरडे यांनी कसलीही खाडाखोड केली नसल्याने खटल्यातील आरोप हे निराधार असल्याचे मान्य करीत या खटल्यातून  सुनीता कोरडे व त्यांचे पती  मोहन कोरडे यांची निर्दोष मुक्तता केली.

या निकालावर प्रतिक्रिया देताना  मोहन कोरडे म्हणाले कि , या निकालामुळे आपल्याच शिक्षक व शिक्षिकेला कायद्याच्या चौकटीत घेऊन सदरील आरोपाखाली जेलमध्ये पाठवण्याचा कट केला परंतु न्यायालयाने सर्व न्याय्य बाजू लक्षात घेऊन हा खटला निकालात काढला . तब्बल ११ वर्षांपासून हा खटला चालू होता. या  आरोपांमुळे  आमची  व  आमच्या संस्थेची समाजात अतोनात बदनामी झाली तसेच खूपच शारीरिक, आर्थिक मानसिक हानीही झाली, काही कोर्सेस विद्यार्थ्या अभावी बंद करावी लागली.  याची भरपाई  मागण्यासाठी वकील बिभीषण जायभाये विरुद्ध प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा आम्ही दाखल करणार आहोत असेही कोरडे दाम्पत्याने सांगितले.

आपलं सरकार