Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InformationUpdate : आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ , जाणून घ्या नवी तारीख

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी पॅन आधार लिंक करण्याची अखेरची तारीख ही ३० सप्टेंबर ही होती. त्याला आता ६ महिन्यांची मुदतवाढ दिली असून आता वाढीव मुदतीनुसार ३१ मार्च २०२२ पर्यन्त पॅन आधार लिंक करता येणार आहे. परंतु जर तुम्ही ३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन आधार लिंक केले नाही, तर तुमचे पॅन निष्क्रिय होणार आहे. याशिवाय तुमच्याकडून दंडही आकारला जाईल. इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ मध्ये कलम २३४(२३एच) जोडण्यात आले आहे. याअंतर्गत त्यात दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने २३ मार्च रोजी लोकसभेत पारित केलेल्या फायनॅन्स बिल २०२१ द्वारे ही तरतूद केली आहे.

कसं चेक कराल स्टेटस?

जर तुम्ही आपलं पॅन कार्डआधार कार्डाशी लिंक केले असेल तर तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून तुमचं स्टेटस तापसून पाहू शकता. यासाठी तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. आपले स्टेटस पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार आणि पॅन कार्डाची माहिती भरावी लागेल. जर तुमचं पॅन आणि आधार लिंक असेल तर तुम्हाला your PAN is linked to Aadhaar Number हा मेसेज दिसेल.

असे लिंक कारातुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड

मात्र जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेली माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाला लिंक होईल. एसएमएस सेवेचा वापर करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN म्हणजेच तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि १० अंकी पॅनकार्ड क्रमांक टाईप करा आणि हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक जाईल. यानंतर तुम्हाला https://www1.incometaxindiaefiling.gov.in/home या संकेतस्थळावर जाऊन लिंक आधार यावर क्लिक केल्यानंतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंक झालं आहे की नाही याची माहिती तुम्हाला मिळेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!