MaharashtraElectionUpdate : मोठी बातमी : राज्यातील जिल्हा परिषद , पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका जाहीर

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाच्या  स्पष्ट निर्देशानंतर अखेर राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून हा कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Advertisements

राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाबद्दल हि घोषणा केली आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोरोनामुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका ९ जुलै २०२१ रोजी आहे. त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या.

Advertisements
Advertisements

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

या प्रकरणी ९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे ११ ऑगस्ट २०२१ रोजीचे कोरोना संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे. तसंच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या व आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले.

निवडणुकांची प्रक्रिया सुरू

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी २२ जून २०२१ रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण त्यावेळी कोरोना संदर्भातील राज्य शासनाच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-३ मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या. आता मात्र या सर्व निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही मदान यांनी सांगितले.

दरम्यान पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. २१ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी २१ सप्टेंबर २०२१ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

निवडणुक कार्यक्रम असा आहे

नाम निर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान; तर ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ निवडणूक प्रभाग आणि पंचायत समितीच्या एकूण १४४ निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल.

 

#MahaClassified | #Advertisement | #MahanayakOnline

https://www.facebook.com/Swara-Financial-Servises-175291287938494/?ti=as

🙋‍♂️ मेडीक्लेम का ❓ कशासाठी ❓

🙋‍♂️ ९०% परिवारांकडे आपत्कालीन वेळेसाठी जमापुंजी रक्कम ठेवलेली नसते…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️ हॉस्पिटल हा आता, एक मोठा व्यवसाय झाला आहे…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️गरज लागल्यावर लगेच मेडीक्लेम कधीच मिळत नाही…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️कमी वयात मेडीक्लेम घेतली तर प्रीमियम सुध्दा कमी लागतो…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️मेडीक्लेम असल्यास कॅशलेस सुविधा मिळते…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️मेडीक्लेम नसेल तर आप्त- नातेवाईक ह्याच्या कडे मदत मागावी लागते…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️मेडीक्लेम नसल्यास आर्थिक कोंडी होते, आयुष्य किमान २/५ वर्षांनी मागे येते…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️संपूर्ण मनःशांती सहित चांगले उपचार घेता यावेत…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️सर्वात महत्वाचे म्हणजे, योग्य वेळीचं घेतलेली मेडीक्लेम असावी, ज्यामुळे नियम/अटी चा अडथळा येऊ नये….नियमानुसार सर्व फायदे घेता यावेत…. म्हणून मेडीक्लेम असावी तीही गरज नसताना घेतलेली. म्हणजे गरजेला तीच धावून येते…. “तुमची मेडीक्लेम”

 

👌मेडीक्लेम ही आज गरज वाटत नसेल तर….आपण बाकी १०% मध्ये असाल तर आनंदच😊…..पण नसाल तर 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ ही वेळ येण्याची वाट पाहण्याची वेळ कोणावरही येऊ नये.
तर मग आजच आपला आरोग्य विमा काढून आपल्या संपुर्ण कुटुंबाला सुरक्षित करा.

Contact
Swara Financial Services
Vishal Kharat
Insurance & Investment Advisor
Mob- 9421911143

News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

📢 जाहिरातीसाठी संपर्क -9028150765 / 9421671520

आपलं सरकार