Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : तृतीय पंथीयाच्या मृत्यू प्रकरणी मजूराला खंडपीठात जामिन

Spread the love

औरंगाबाद :  एका तृतीयपंथीयाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी लातूर कोर्टाने दाखल करून घेतलेल्या खून प्रकरणाच्या आरोपपत्रानुसानुसार अटकेत असलेल्या ऊसतोड मजूराला न्या.एम.जी.सेवलीकर यांच्या खंडपीठाने जामिन मंजूर केलाआहे. सुनिल मोतीराम राठोड असे जामिन मिळालेल्या ऊसतोड मजूराचे नाव आहे.डिसेंबर २०२० साली सुदर्शन उर्फ पूजा याचा अपघात झाल्याचे दिसताच सुनिल राठोडने पूजाला चाकूर रुग्णालयात दाखल केले पण तेथील डाॅक्टरांनी पूजाला तपासून मयत घोषित केले.

या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात पूजाच्या आकस्मित मृत्यूची नोंदही झालेली आहे.पुढे पोलिस तपासात मयत पूजाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अहवाल आला की, पूजाचा मृत्यू डोक्याला जबर मारहाण झाल्यामुळे झाला व शरीरात इतर ठिकाणी रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. हा अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर मयत पूजाचे कोणीही नातेवाईक खुनाची तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. म्हणून चाकूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी इश्वर उत्तम स्वामी यांनी आरोपी सुनिल राठोड ने पूजाचा खून केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल झाला होता. लातूर कोर्टात सरकार तर्फे वकीलांनी बाजू मांडतांना युक्तीवाद केला होता की, मयत पूजा सोबत आरोपी सुनिल राठोड चे संबंध होते .पूजा भिक मागून दोघांची उपजिवीका भागवत होती. तसेच रुग्णालयाच्या सी.सी.टिव्ही फुटेज मधे आरोपी सुनील  राठोडनेच पूजाला उपचारासाठी दाखल केले होते.

या संपूर्ण घटनाक्रमाचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता.तरीही हा युक्तीवाद लातूर न्यायालयाने ग्राह्य धरुन सुनिल राठोड ला आरोपी केले होते. पण सुनिल राठोड ने लातूर न्यायालयाच्या निकालाला खंडपीठात आव्हान दिले.आरोपी सुनिल राठोड यांच्या वतीने अॅड.प्रशांत नागरगोजे यांनी युक्तीवाद केला की, मयत पूजा उर्फ सुदर्शन याचा मृत्यू नेमका कसा झाला याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नाही. मयताचे नातेवाईक तक्रार देण्यास टाळाटाळ करंत होते.म्हणून पोलिस कर्मचार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गून्ह्यात लातूर न्यायालयाने दिलेला निकाल ग्राह्य कसा धरावा ? अॅड.नागरगोजे यांचा युक्तीवाद व उलट तपासणीत सादर करण्यात आलेले साक्षीपुरावे ग्राह्य धरुन खंडपीठाने आरोपी राठोड ला जामिन मंजूर केला आहे. वरील प्रकरणात सरकार तर्फे अॅड.एस.डी.घयाल तर याचिकाकर्ते सुनिल राठोड यांच्यावतीने अॅड.प्रशांत नागरगोजे यांनी काम पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!