IndiaNewsUpdate : मेरे देश मे … मुस्लिम असताना डोसा स्टॉलला “हिंदू ” नाव दिले म्हणून काय झाले ते पहा… !!

Advertisements
Advertisements
Spread the love

मथुरा : उत्तर प्रदेशमधील मथुरेतील कोतवाली पोलीस ठाण्यात हिंदू नावाचा डोसा स्टॉल चालवणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला स्टॉल बंद करण्यास सांगण्यात आला असल्याचे वृत्त आहे. याबाबत स्थानिकांनी तक्रार दाखल केली आहे. हा मुस्लिम व्यक्ती “श्रीनाथ” नावाचा डोसा स्टॉल चालवत होता. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १८ ऑगस्ट रोजी काही लोक इरफानच्या स्टॉलजवळ आले आणि त्यांने स्टॉलला “श्रीनाथ” नाव का दिले ? याबद्दल विचारणा केली. त्यानंतर त्या लोकांनी स्टॉलवरचे नावाचे बॅनर फाडले, दुकानाची तोडफोड केली आणि स्टॉल हटवण्यास सांगितले.

Advertisements

या स्टॉलवरील कामगारांनी सांगितले की, हा स्टॉल राहुल नावाच्या एका व्यक्तीच्या मालकीचा आहे. हा स्टॉल चालवण्यासाठी त्याला ४०० रुपये रोज देण्यात येतो. स्टॉल चालवणाऱ्या इरफानने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “आम्ही गेल्या पाच वर्षांपासून हा स्टॉल चालवत आहोत. नावामुळे आतापर्यंत कोणतीही अडचण आलेली नाही. स्टॉलचं नाव एखादी समस्या असू शकते, असा आम्ही कधी विचारही केला नव्हता. त्या दिवशी काही लोक आले आणि बॅनर फाडून म्हणाले की मुस्लिम लोक हिंदू नावाने दुकान चालवू शकत नाहीत. त्यांच्या वागण्यावरून त्यांना स्टॉलच्या नावामुळे अडचण होती, हे स्पष्ट दिसत होतं.”

Advertisements
Advertisements

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये काही जण डोसा-विक्रेत्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत. स्टॉलचं नाव श्रीनाथ ठेवल्याने “हिंदू जेवायला येतील” असे तुला वाटते का ? असेही व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ नंतर देवराज पंडित या जमावाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट केला. पंडितने विक्रेत्यावर “आर्थिक जिहाद”चा आरोप केला आणि त्याच्यासारख्या लोकांमुळे हिंदूंना रोजगार मिळत नाही, असे म्हटले आहे. पंडित यांनी आपल्या फेसबुकवरील मित्रांना रोजगारासाठी सनातन धर्माची मदत घेणाऱ्या अशा विक्रेत्यांचा निषेध करण्याचं आवाहन केले होते.

आपलं सरकार