Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : तब्बल ९ वर्षांनी जन्मठेपेच्या शिक्षेतून सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता

Spread the love

औरंगाबाद- बस कंडक्टरच्या घरात बाॅंबस्फोट घडवून आणल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या आरोपीची न्या.व्ही.के.जाधव आणि न्या.एस.जी.डिगे यांच्या खंडपीठाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आबा उर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी (३५) रा.केंद्रेवाडी ता.धारुर जि.बीड असे जन्मठेपेच्या शिक्षेतून मूक्त झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या खटल्याची अधिक माहिती अशी कि , ३० नोव्हेंबर २०१२ रोजी केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळेगावात ओम निंबाळकर या कंडक्टरच्या घरामधे रेडिओचा स्फोट होऊन त्यांची आई, पत्नी ,मुलगा व स्वता:निंबाळकर गंभीर जखमी होऊन कुटुंबातील चारही जणांचे बरेच अवयव निकामी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. तपासामधे घटनास्थळावर मोबाईल खरेदी केल्याची पावती सुस्थितीत मिळाली. त्यावर केंद्रेवाडीतील नाना टरकसे या व्यक्तीचे नाव होते. टरकसेची चौकशी केली असता हा मोबाईल गावातील आबा गिरी खरेदी करु शकतो असा संशय टरकसेने व्यक्त केल्यानंतर संशयावरुन आबा गिरीला पोलिसांनी अटक केली. पुढे तपासामधे मोबाईल विक्रेत्याने आबा गिरी ने मोबाईल खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली.

ओम निंबाळकर हे आंबाजोगाई मुंबई या बस मधे कंडक्टर म्हणून कर्तव्य बजावत असतांना त्यांना एक बेवारस बॅग बसमधे सापडली.पण ती निंबाळकर यांनी डेपोत जमा न करता घरी नेली. त्या बॅग मधे एक रेडिओ, मोबाईल खरेदी केल्याची पावती मिळाली होती. घरी नेल्यानंतर त्या रेडीओ मधे सेल घालताच रेडीओचा स्फोट झाला.पुढे हा तपास डीवायएसपी शिंदे यांनी सुरु केला.

दरम्यान आबा गिरी ला या प्रकरणात अटक झाली. अंबाजोगाई कोर्टातून गिरी ला टरकसे च्या साक्षीवरुन जन्मठेपेची शिक्षा झाली. पोलिस तपासात उघंड झाले की, टरकसे ने खोट्या अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात आबा गिरी ला अडकवले होते. म्हणून आबा गिरी ने टरकसे याच्या नावावर मोबाईल खरेदी केला होता.पण अटकेनंतर आबा गिरी ने अंबाजोगाई कोर्टाच्या निकालाला खंडपीठात आव्हान दिले.

आबा गिरी चे वकील अॅड.सिध्देश्वर ठोंबरे यांनी या खटल्यात युक्तीवाद करतांना म्हटले की, जखमी कंडक्टर ओम निंबाळकर यांनी आरोपी आबा गिरी ला बसमधे रेडीओ असलेली बॅग ठेवतांना बघितले  नाही. अशा गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हाधिकारी बीड यांची विशेष परवानगी लागते तीही पोलिसांनी घेतली नाही.व बाॅंबस्फोट झाल्यानंतरही मोबाईल खरेदीची पावती सुस्थितीत मिळणे हे संशयास्पद वाटते. हे तीन मुद्दे खंडपीठाने विचारात घेत आबा गिरी यांची जन्मठेपेच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!