नवजात शिशूचे अपहरण महिला अटकेत

Spread the love

औरंगाबाद – एक दिवसाच्या मुलाला पळवून नेणार्‍या महिलेला बेगमपुरा पोलिसांनी ४ तासात अटक केली आहे. तिला कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कविता संतोष मुदगल(३५) रा.आडगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. सोनाली दिगंबर हाराळे (३०) रा.चांदा ता.नेवासा ही बाळंतपणासाठी लिंबेजळगाव येथे माहेरी आली असता. २२फेब्रू रोजी घाटी रुग्णालयात सकाळी ७वा प्रसुत होऊन मुलगा झाला.मंगळवारी सकाळी ७.३०वा. हाराळे या बाथरुम ला जाऊन येई पर्यंत त्यांचे बाळ पलंगावरुन बेपत्ता झाले होते. या प्रकरणी दुपारी १२.३०वा गुन्हा दाखल झाल्यावर MH20f 3162 या रिक्षात एक महिला बाळाला घेऊन गेली असे पोलिसांना समजले. पोलिसांनी रिक्षाचा माग काढत जाफरगेट परिसरातील तक्षशिला नगरातून आरोपी महिलेला नवजात शिशूसह ताब्यात घेतले. बाळाला आईच्या स्वाधिन केल्यानंतर कविता मुगदल ला अटक केली. नवजात शिशू विक्री करण्याच्या उद्देशाने पळवला असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गात करंत आहेत.

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.