MaharashtraCrimeUpdate : नापास करण्याची धमकी देऊन शिक्षक करत होता अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

Spread the love

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत असून तिची आईही शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवर २०१६  पासून अत्याचार करीत होता. पीडित मुलीला तुला नापास करेन आणि तुझ्या आईची नोकरी घालवेन, अशी धमकी देऊन हा नराधम शिक्षक तिच्यावर शरिरिक अत्याचार करीत होता.

अखेर या नराधम शिक्षकाच्या अत्याचाराला न घाबरता या मुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानंतर माणगाव पोलीस स्टेशनमध्ये मदन वानखेडे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीनंतर शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर माणगाव पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.