Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldCoronaNewsUpdate : इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाची दहशत , अनेक भागात पुन्हा लॉक डाऊन , भारताच्या शेअर बाजारावर मोठा परिणाम

Spread the love

आधीच्या कोरोनाची दहशत संपलेली नसताना इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचे संकट आले आहे. या नव्या प्रकाराच्या  कोरोना व्हायरसने इंग्लंडमधील परिस्थिती आणखी चिंताजनक झाली आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी स्वतः कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेल्याची कबुली दिली आहे. ब्रिटनमध्ये नव्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये लॉकडाउनची घोषणा केली असल्याचे वृत्त आहे.

भारताच्या शेअर बाजारावरही याचा प्रतिकूल परिणाम झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३०० अंकांनी कोसळला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर भारताचे केंद्रीय  आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भारतीय नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले असून तूर्त ब्रिटनमधून येणारी आणि ब्रिटनला जाणारी विमानसेवा बंद केली आहे.

लाखो नागरिकांवर पुन्हा एकदा घरातच थांबवण्याची वेळ

या नव्या कोरोनाबाबत रविवारी, ‘बीबीसी’च्या एका कार्यक्रमात बोलताना ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची कबुली त्यांनी दिली. त्याशिवाय ब्रिटनमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले. नाताळात सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर लोकांनी स्वत: घरी थांबावे आणि करोनाला अटकाव करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा कोरोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावतो. लंडन आणि दक्षिण इंग्लंडच्या भागात हा विषाणू वेगाने फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रविवारपासून कठोर नियमांसह लॉकडाउन सुरू करण्यात आला. त्यामुळे लाखो नागरिकांवर पुन्हा एकदा घरातच थांबवण्याची वेळ आली आहे.

नाताळाच्या गर्दीवरही निर्बंध , फक्त तीन कुटुंबियांना एकत्र येण्यास परवानगी

याबाबत अधिक माहिती देताना इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी प्रा. क्रिस विट्टी यांनी सांगितले की, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत सूचना दिली आहे. त्याशिवाय उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे करोना विषाणूच्या या नव्या प्रकाराचा अभ्यास सुरू आहे. नव्या कोरोना विषाणूचा  हा प्रकार अधिक घातक आहे, याबाबत कोणताही सबळ पुरावा अद्याप समोर आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, लंडन आणि दक्षिण इंग्लंडसह अनेक भागात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याशिवाय घराबाहेरील व्यक्तिंनाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध नाताळा दरम्यानही असणार आहेत. तर, सौम्य प्रतिबंध लागू केलेल्या भागातही नाताळादरम्यान २५ डिसेंबर रोजी तीन कुटुंबियांना एकत्र येण्यास परवानगी असणार आहे. मात्र, ही परवानगी पाच दिवस नसणार.

भारत सरकारचा अलर्ट

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या पार्श्वभूमीवर सांगितले कि , सरकार पूर्णपणे आपल्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे जागरूक असून ज्याचे परिणाम आपण गेल्या वर्षभरापासून पाहत आहोत. लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या विषयावर सोमवारी या विषयावर संयुक्त नियंत्रण समूहाची बैठक होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करून ब्रिटनहून येणाऱ्या सर्व विमानांना बंद करावे असे म्हटले आहे. जगातील अनेक देशांनी ब्रिटनच्या विमानांवर येण्या -जाण्यास बंदी घातली आहे. नव्या कोरोनामुळे ब्रिटनमध्ये ३१ टक्के जनता पुन्हा लॉकडाऊनमध्ये गेली आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनामुळे जगभरातील शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला असून भारतातील शेअर बाजार ४ टक्केपर्यंत खाली आला आहे .  याबाबत मटा ऑनलाईनच्या वृत्तात म्हटले आहे कि , अमेरिकेच्या आर्थिक पॅकेजबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त बाजारात नफावसुली सुरु असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विश्लेषक व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले. आज चलन बाजारात डॉलरसमोर १३ पैशांनी घसरला आहे. तो ७३.७० रुपये आहे. निफ्टी १३७०० च्या स्तरावर आहे. आज ऑटोच्या शेअरला विक्रीचा फटका बसला. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३०० अंकांनी कोसळला असिन  तो सध्या ४६६७६ अंकावर आहे. निफ्टी ९८ अंकांनी घसरला असून तो १३६६२ अंकावर ट्रेड करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!