Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या 24 तासात राज्यात 4268 नव्या रुग्णांची नोंद , 2774 डिस्चार्ज तर  87 रुग्णांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात ४ हजार २६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर  ८७ कोरोना  बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ७७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ७३ हजार ३१५ इतकी आहे. दरम्यान राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ७२ हजार ४४० इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ८७ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २३ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीपेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान राज्यात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले  असल्याचा दावा केला जात असला तरी कोरोनाच्या आकडेवारीत मात्र रोज मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा कोरोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांचा आकडा वाढल्याचे चित्र आहे . दिवसभरात ४ हजार २६८ रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी २ हजार ७७४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्णांनी करोनावर मात केली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९३.४६ टक्के इतके झाले आहे.

राज्यात आतापर्यंत करोनाच्या १ कोटी १५ लाख ७० हजार १३७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील १८ लाख ७२ हजार ४४० (१६.१८ टक्के) चाचण्यांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५ लाख ३२ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार १२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात ७३ हजार ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यातील उपचार घेत असलेल्या अर्थात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७३ हजार ३१५ वर आला आहे. यात सर्वाधिक १६ हजार ३५७ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात १३ हजार ४४७ तर मुंबई पालिका हद्दीत १२ हजार ४२३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. बाकी जिल्ह्यांतील अॅक्टिव्ह रुग्णांचा ग्राफ वेगाने खाली येताना दिसत असून तो खूप मोठा दिलासा ठरला आहे. राज्यात आज ८७ करोना बाधित रुग्ण दगावले असून आतापर्यंतचा मृतांचा आकडा ४८ हजार ५९ इतका झाला आहे. आज सर्वाधिक १३ मृत्यू मुंबई पालिकेच्या हद्दीत झाले आहेत. पुणे पालिका हद्दीत ५ मृत्यू झाले आहेत तर ठाणे पालिका हद्दीत आज करोनाने रुग्ण दगावला नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!