Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन

Spread the love

केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बारी नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.  मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांचे चिरंजीव खा.  चिराग पासवान यांनी हि बातमी ट्विट करून दिली आहे. ‘बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात. Miss you Papa…’ असं ट्विट चिराग पासवान यांनी केलं आहे.  बिहारच्या हाजीपूर मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. रामविलास पासवान यांनी गेल्या ३२ वर्षांपासून ११ निवडणुका लढल्या त्यापैकी केवळ दोन निवडणूक ते हरले होते . बाकी ९ वेळा ते जिंकले होते. सहा पंतप्रधानांसोबत त्यांनी सतत मंत्रिपद भूषविल्याचे आणि सर्वाधिक मतांनी निवडून आल्याचे त्यांचे रेकॉर्ड आहे.

https://twitter.com/ANI/status/1314235261677563908

रामविलास पासवान हे  लोक जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक, अध्यक्ष आहेत. भारतातील बिहार राज्यातील एका मागास परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित होते. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला होता  आणि सर्वप्रथम  ते  १९६९ साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले होते. बिहारच्या राजकारणातील  एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केले आहे . भारतीय राजकारणात त्यांचा मोठा दरारा होता.

बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील शाहरबन्नी या गावात पासवान यांचा जन्म झाला होता.  १९६० मध्ये त्यांचा विवाह  राजकुमारी देवी यांच्याशी विवाह झाला होता . १९८१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना राजकुमारीदेवी यांच्यापासून आशा आणि उषा अशा दोन कन्या आहेत तर १९८३ मध्ये त्यांनी अमृतसरच्या एअरहोस्टेस रीना शर्मा यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा खा. चिराग आणि एक मुलगी आहे.

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!