Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusEffect : लग्नाच्या खुशीत पार्टी दिली खरी पण , स्वयंपाकीच निघाला पॉझिटिव्ह , अनेक मोठे लोक आले अडचणीत….

Spread the love

कोरोना संसर्गाच्या अनेक कथा समोर येत आहेत. याच बातम्यांच्या मालिकेत नंदुरबारमधल्या काँग्रेस नगरसेवकाने आपल्या मुलाच्या लग्ना प्रित्यर्थ दिलेल्या जंगी पार्टीचे जेवण बनविणारा स्वयंपाकीच कोरोना बाधित निघाला असल्याने पार्टीला उपस्थिती  लावणारे अनेक अधिकारी आणि प्रतिष्ठीत कोरोना संशयाच्या जाळ्यात अडकले आहेत. नंदुरबारचे काँग्रेस नगरसेवक खान परवेज करामतभाई यांनी ही पार्टी  दिली होती. दरम्यान परवेज करामतभाई यांनी मात्र त्या आचाऱ्याने  स्वयंपाक बनवला नव्हता असा दावा केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार काँग्रेसचे नगरसेवक खान परवेज करामतभाई यांनी जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या फार्म हाऊसवर आपल्या मुलाच्या लग्नाच्या आनंदात  पार्टीचे आयोजन केले होते. मात्र या पार्टीतील स्वयंपाकीच कोरोना बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे ही पार्टी चौकशीच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे सोशल डीस्टंन्ससिंगच्या नियमांचे  उल्लंघन करत  या नेत्याच्या पार्टीला तीनशेहुन अधिक पुढारी, अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान नंदुरबार जिल्हा भाजपाने या पार्टी आयोजन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र  संबधीत नगरसेवकाने हा कार्यक्रम परवानगी घेवून केल्याचे पत्रक प्रसिद्ध करून यामध्ये  ५० पेक्षा कमी लोक उपस्थित होते असा दावा केला आहे. संबंधित आचारी कोरोनाबाधित असला तरी त्याने स्वयंपाक केलेला नव्हता तर  दुसऱ्या आचाऱ्याने स्वयंपाक तयार केल्याचेही करामतभाई यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे. मात्र पॉझिटिव्ह व्यक्ती ही आपली नातेवाईक असल्याचे त्यांनी मान्य केलं आहे. दरम्यान आरोप -प्रत्यारोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तीन सदस्यीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली असून या प्रकरणानंतर आता नंदुरबार मधील राजकारण देखील तापले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!