बहुचर्चित भीमा कोरेगावच्या तपासावरून काँग्रेसनेही व्यक्त केली नाराजी , एनआयएच्या तपासावरून महाविकास आघाडीत तिढा…

Advertisements
Advertisements
Spread the love

बहुचर्चित भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा तपास एनआयकडे देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेसनेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे कि ,  ‘आपण (महाविकास आघाडीमध्ये) सहकारी आहोत. त्यामुळे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणं अयोग्य आहे. तुमच्याकडे (उद्धव ठाकरेंकडे) सत्ता असेल पण त्याचा वापर कायदेशीररित्या होणं आवश्यक आहे.’ अशी प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली आहे.

Advertisements

याच मुद्द्यावरून याआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून  टीका केली होती. कोल्हापुरातील एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘केंद्राने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवणे चुकीचं आहे आणि केंद्राच्या निर्णयाला राज्य सरकारने पाठिंबा देणे त्याहुनही चुकीचं आहे’ अशी टीका शरद पवारांनी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं या घटनांवरून दिसत आहे. भीमा कोरेगावचा तपास एनआयए देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने माघार घेत तपास एनआयएकडे देण्यास सहमती दिली.  मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकार वापरून हा निर्णय घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनावरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपले अधिकार वापरत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय झाल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत नाराजीच्या सुरात जाहीरपणे सांगितलं  होतं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार